अलिबाग : अलिबाग तालुक्यात रविवारी चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मोठे शहापूर येथील जेएसडब्ल्यू कंपनीचा कंत्राटी कामगार, एक गृहिणी, नेहुली-खंडाळे व मांडवी मोहल्ला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एका ४८ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. इस्टेट एजंट असलेला हा रुग्ण मुंब्रा, ठाणे येथून अलिबागला आला होता. तसेच अलिबागनजीक खंडाळे येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद करण्यात आली. ५८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली. या सर्व रुग्णांना जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
अलिबागमध्ये चौघांना लागण
अलिबाग तालुक्यात रविवारी चार नवे रुग्ण आढळून आले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2020, 4:00 am