अलिबागः लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ९२ किलो वजनाच्या गांजासह चार वाहने जप्त करण्यात आली. कर्जत तालुक्यातील पळसदरी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून गांजाची वाहतूक करणाऱ्या गाडीसह दोघांना पकडले व नाशिक येथील आणखी एकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४९ किलो ७०० ग्रॅम वजनाचा पाच लाख ९६ हजार ४० रुपये किंमतीचा गांजा तसेच स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली.
अलिबागमध्ये गांजा जप्त
अलिबागः लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ९२ किलो वजनाच्या गांजासह चार वाहने जप्त ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2020, 4:00 am