नवी मुंबई महापालिकेचे नेरुळ आणि ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालय, बेलापूरच्या माता बाल रुग्णालयांना गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयांमध्ये नव्याने पुरवठा झालेल्या उपकरणांच्या वापराचा आढावा घेतला. या तिन्ही रुग्णालयांमध्ये ३० प्रकारच्या एकूण ३७७ उपकरणांचा पुरवठा झाला असून ११ प्रकारची वैद्यकीय उपकरणे पुरवठा करण्यासाठी निविदाकारांना कार्यादेश दिले आहेत. यापैकी पोर्टेबल व्हेंटिलेटर, सिरिंज पंप, सर्व प्रकारचे ऑपरेशन टेबर, एक्स रे मशिन्स, निर्जंतुकीकरण विभागाची उपकरणे, बालरोग विभागाच्या उपकरणांचा वापर सुरू झाला आहे. याशिवाय, आगामी पावसाळा परिस्थितीचा विचार करता रुग्णालयांत उपलब्ध औषधसाठा, सर्जिकल साहित्य याबाबतचा आढावा घेण्यात आला.
रुग्णालयांची पाहणी
नवी मुंबई महापालिकेचे नेरुळ आणि ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालय, बेलापूरच्या माता बाल रुग्णालयांना गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन...
Maharashtra Times 2 Jun 2018, 4:00 am