अ‍ॅपशहर

बेकायदा अकृषिक वापर; ३५ लाखांची वसुली

शेतजमिनीवर घराचे अथवा कोणतेही बांधकाम करण्यासाठी बिनशेती परवाना घेणे बंधनकारक असून पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांत फार्महाऊसची संख्या मोठी आहे. या बेकायदा अकृषिक वापरातून पनवेलच्या महसूल विभागाने ३५ लाख ६७ हजारांची वसुली केली आहे.

Maharashtra Times 11 Mar 2017, 3:00 am
पनवेल : शेतजमिनीवर घराचे अथवा कोणतेही बांधकाम करण्यासाठी बिनशेती परवाना घेणे बंधनकारक असून पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांत फार्महाऊसची संख्या मोठी आहे. या बेकायदा अकृषिक वापरातून पनवेलच्या महसूल विभागाने ३५ लाख ६७ हजारांची वसुली केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal non agriculture use of land 35 lacs fine recoverd by panvel revenue department
बेकायदा अकृषिक वापर; ३५ लाखांची वसुली


कर्नाळा अभयारण्य, माथेरान डोंगराच्या पायथ्याचा मालडुंगे परिसर, ठाणे जिल्ह्याची हद्द असलेल्या मोर्बे भागात मोठ्या संख्येने फार्महाऊस आहेत. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे फार्महाऊस मुंबईचे बडे उद्योजक, सेलिब्रिटी सेकंड होम म्हणून वापर करतात. तर, पनवेल तालुक्यातील धनाढ्य स्थानिकांचीदेखील फार्महाऊस तसेच घरे आहेत. यातील अनेक बांधकामांना बिनशेती परवाना नसतानाही ती बांधण्यात आली आहेत. गतवर्षी १४८ वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदा अकृषिक वापर केला जात होता. यामध्ये १११ प्रकरणे नव्याने समोर आली असून तालुक्यात २५९ ठिकाणी एक लाख ५५ हजार ५५१ चौरस मीटर क्षेत्रावर बांधकामे करण्यात आली आहेत. मार्च २०१७ पर्यंत यातील १०० बांधकामांना दंड ठोठावून तब्बल ३५ लाख, ६७ हजार ३०५ रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित १५९ जणांकडून दंड वसूल करण्यास महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. यामध्ये घरांपेक्षा फार्महाऊसची संख्या मोठी असून पनवेल तालुक्यातील जवळपास सगळ्याच फार्महाऊसकडून बेकायदा अकृषिक वापराचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज