पनवेल : पनवेलमध्ये गुरुवारी पाच व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये खारघरमधील ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. पतीला करोना झाल्यामुळे तिला लागण झाल्याचे सांगितले जात आहे. नवीन पनवेलमधील ५४ वर्षीय व्यक्तीलाही संसर्ग झाला. मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या २८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कामोठ्यात राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीलादेखील संसर्ग झाला. ही व्यक्ती फार्मा कंपनीत आहे. कामोठ्यातील २९ वर्षीय आणखी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली असून ती मुंबईतील टाटा रुग्णालयात काम करते. पनवेलमधील एकूण करोनाबाधितांचा आकडा ६७ इतका झाला आहे. यातून बरे होऊन गेलेले रुग्ण २८ इतके असून सध्या ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.
पनवेलमध्ये पाच जणांना संसर्ग
पनवेलमध्ये गुरुवारी पाच व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले यामध्ये खारघरमधील ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2020, 4:00 am