ऐरोली प्रभाग क्रमांक १५च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता पाटील यांच्या प्रभागातील विविध नागरी कामांचा शुभारंभ ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. याप्रसंगी ऐरोली तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक अशोक पाटील, नगरसेविका संगीता पाटील, प्रभागातील नागरिक उपस्थित होते. या नागरी कामांमध्ये नक्षत्र गार्डन सेक्टर १५ येथे ओपन जिम हस्तांतरण करण्यात आले. सेक्टर १४ येथील लेकव्ह्यू सोसायटीच्या बाजूला जॉगिंग ट्रॅकवर निवारा शेड बांधणे, हेगडे भवनच्या बाजूचा पार्किंगसाठी असलेल्या भूखंडाचे सुशोभीकरण करणे, सेक्टर १५ येथील मैदान व आंबेडकर भवनाच्या बाजूला दिवाबत्तीची सोय करणे, सेक्टर १५ येथील स्वामी विवेकानंद उद्यानामधील अंतर्गत सुशोभीकरण करणे या कामांचा समावेश आहे.
विकासकामांचा शुभारंभ
ऐरोली प्रभाग क्रमांक १५च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता पाटील यांच्या प्रभागातील विविध नागरी कामांचा शुभारंभ ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या ...
Maharashtra Times 12 May 2018, 4:00 am