अ‍ॅपशहर

खारघरमध्ये मॅरेथॉन

आरोग्य आणि शरीर तंदुरुस्तीबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने यंदा 'हम फिट तो इंडिया फिट' असे घोषवाक्य घेऊन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल ...

Maharashtra Times 18 Dec 2018, 1:26 am
नवी मुंबई : आरोग्य आणि शरीर तंदुरुस्तीबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने यंदा 'हम फिट तो इंडिया फिट' असे घोषवाक्य घेऊन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जानेवारी रोजी खारघर मॅरेथॉन-२०१९ होत असल्याची माहिती ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathon in kharghar
खारघरमध्ये मॅरेथॉन


खारघर सेक्टर १९मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून खारघर मॅरेथॉनची सुरुवात होईल. उद्घाटन सोहळा सकाळी सहा वाजता आणि पारितोषिक वितरण सोहळा सकाळी नऊ वाजता होणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख १० जानेवारी (सायंकाळी पाचपर्यंत) असून, प्रवेश शुल्क १०० रुपये आहे. या स्पर्धामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट देण्यात येणार असून, स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पदक प्रदान केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी नावनोंदणी अर्ज तसेच मिस्ड कॉल (७७५७० ०००००), वेबसाइट, अॅप आदी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. नावनोंदणी अर्ज रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये उपलब्ध असून, नोंदणीअर्ज स्कूलमध्येच स्वीकारले जाणार असल्याची माहिती परेश ठाकूर यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज