अ‍ॅपशहर

तरुणीचा विनयभंग

१७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिला प्रेमसंबध ठेवण्यासाठी भाग पाडून मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात नेरुळ पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रंजीत पवार (२५) असे या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Maharashtra Times 19 Dec 2017, 4:00 am
नवी मुंबई : १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिला प्रेमसंबध ठेवण्यासाठी भाग पाडून मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात नेरुळ पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रंजीत पवार (२५) असे या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम molestation of minor girl
तरुणीचा विनयभंग


पीडित १७ वर्षीय तरुणी नेरुळमध्ये राहण्यास आहे, आरोपी रंजीत पवार हा पनवेल येथे राहतो. या दोघांची वर्षभरापूर्वी ओळख झाली. त्यानंतर मैत्री होऊन त्यांचे रूपांतर प्रेमात झाले होते. दरम्यानच्या काळात या दोघांमध्ये फाटाफूट झाल्याने दोघांनी एकमेकांशी संपर्क करणे सोडून दिले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रंजीतने पुन्हा या तरुणीकडे प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी तो नेहमी तिचा पाठलाग करत होता. मात्र तरुणीने त्यास नकार दिला. त्यामुळे रंजीतने रागाच्या भरात पीडित तरुणीला मारहाण केली. या प्रकारानंतर तरुणीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिल्यानंतर त्यांनी नेरुळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज