अ‍ॅपशहर

पांढऱ्या कांद्याला अधिक मागणी

वाशीतील घाऊक बाजारात सध्या लाल आणि गुलाबी कांद्याव्यतिरिक्त पांढऱ्या कांद्याची आवक होऊ लागली आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याला मर्यादित मागणी असते. त्यानुसार हा कांदा बाजारात विकला जातो

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 17 Feb 2021, 6:01 pm
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईः वाशीतील घाऊक बाजारात सध्या लाल आणि गुलाबी कांद्याव्यतिरिक्त पांढऱ्या कांद्याची आवक होऊ लागली आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याला मर्यादित मागणी असते. त्यानुसार हा कांदा बाजारात विकला जातो. मात्र या वर्षी लाल कांद्याच्या तुलनेत या कांद्याचे दर कमी असल्याने त्याची मागणी वाढली आहे. पांढरा कांदा घाऊक बाजारात २० ते २५ रुपये किलो तर, नेहमीचा कांदा ४० ते ४५ रु किलो आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम more demand for white onions
पांढऱ्या कांद्याला अधिक मागणी


गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर चढे आहेत. आवक कमी असल्याने कांदा ४० ते ४५ रुपये किलोवर पोहोचला आहे. मात्र दर वाढूनही कांद्याला मागणी आहे. सध्या घाऊक बाजारात नाशिक, पुणे येथून कांदा येत आहे. मात्र त्याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी आहे. या महाग कांद्याला पांढऱ्या कांद्याचा उतारा मिळाला आहे. चवीला काहीसा गोड असणारा पांढरा कांदा जेवणात घेतला जातोच, मात्र त्याचे काही औषधी गुणधर्मही आहेत. नेहमीचा कांदा महाग असल्याने या कांद्याला यंदा अधिक मागणी आहे.

पांढऱ्या कांद्यासाठी अलिबाग आणि वसई प्रसिद्ध आहे. मात्र तेथील कांदा घाऊक बाजारात येत नाही. तो स्थानिक किरकोळ बाजारातच संपतो. मात्र पुणे, नाशिक येथील काही शेतकरी अधूनमधून पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. मात्र सध्या आलेला हा पांढरा कांदा गुजरातमधून दाखल होत आहे. या कांद्याची रोज आठ ते दहा गाड्या आवक होत आहे, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

MANISHA THAKUR -JAGTAP

MAHARASHTRA TIMES .

.NAVI MUMBAI.

.BELAPUR .

.9869337067.

7710077067

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज