अ‍ॅपशहर

मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा

मुंबई-गोवा महामार्गाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून पनवेल ते वडखळ हे अवघे ३७ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सुमारे अडीच तासांचा कालावधी लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरून दररोज जाणारे प्रवासी पूर्णपणे वैतागले आहते. त्यामुळे पनवेल ते वीर मार्गावर एक शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Maharashtra Times 25 Jul 2016, 4:49 am
पनवेल ते वीर शटलसेवेची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai goa road damage
मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा


वैभव भोळे, अलिबाग

मुंबई-गोवा महामार्गाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून पनवेल ते वडखळ हे अवघे ३७ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सुमारे अडीच तासांचा कालावधी लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरून दररोज जाणारे प्रवासी पूर्णपणे वैतागले आहते. त्यामुळे पनवेल ते वीर मार्गावर एक शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळी सहा वाजता घर सोडले तरी नियोजित वेळेवर पनवेल, मुंबईकडे पोहोचू याची खात्री राहिलेली नाही. तर परतीचा प्रवास अनेकदा मध्यरात्रीनंतर संपतो. यामुळे होणारी अपुरी झोप, खड्ड्यामुळे उद्भवणार मणक्यांचे आजार आण‌ि ताणतणाव यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाही. मानवी साखळी करून, मोर्चे काढून प्रवाशांनी आपले अस्तित्व दाखविण्याचे प्रयत्न केले आहेत. तरीही अद्याप निद्रीस्त प्रशासनास जाग आलेली नाही. प्रवासी महाड, अलिबाग, रोहा पेण व मुरुड भागातून नोकरी व कामधंद्यानिमित्त मुंबई, वाशी आण‌ि पनवेलच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे गांभीर्य समजून घेऊन त्यांच्या त्यांचे निरसन करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिध‌िंनी त्यांच्या मागण्यास सरकार दरबारी लावून धरून पनवेल-रोहा-वीर या रेल्वेमार्गावर शटल सेवा सुरू करण्यासाठी आग्रह धरावा अशी प्रवाशांची विनंती आहे. सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर सातच्या दरम्यान पनवेलहून तर सकाळी सातच्या दरम्यान विरहून ट्रेन सोडल्यास सकाळी अकराच्या सुमारास विनाट्रॅफीक या मार्गावरील प्रवासी सुखरूप मुंबई व परतीचा प्रवास करू शकतात. दिवाळीपर्यंत रस्ते सुस्थितीत होणार नाहीत. आता काही ठिकाणी माती, खडी टाकून तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्याचेकाम चालू आहे. अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे पुन्हा खड्डे तयार होत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज