अ‍ॅपशहर

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ‘हाइट बॅरिअर्स’

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहनांसाठी ‘हाइट बॅरिअर्स’ बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Maharashtra Times 21 Jun 2017, 3:00 am
आशिष घरत, उरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai pune express way will get hight barriers
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ‘हाइट बॅरिअर्स’


मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहनांसाठी ‘हाइट बॅरिअर्स’ बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाकडून अनेक प्रयत्न होत आहेत. हायवेवर गेल्या काही महिन्यांपासून ह्युमन पोलिसिंग, गोल्डन अवर अशा मोहिमाही राबविण्यात येत आहेत. त्यातच या हायवेवर अवजड वाहने हे बेशिस्तपणे वाहने चालवून अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचेही आढळून आले आहे. अनेकदा ही वाहने मुख्य लेन सोडून दुसऱ्या आणि फास्ट लेनमधून धावताना दिसतात. अशा बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी या मार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या खालापूर टोल ते लोणावळा दरम्यानच्या सुमारे १९ किलोमीटरच्या टप्प्यात ‘हाइट बॅरिअर्स’बसविण्यात येणार आहेत. तसेच, मुंबई-पुणे हायवेवर दररोज किमान ३०० ते ३५० लहान- मोठ्या वाहनांवर लेन कटिंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

खालापूर टोल ते लोणावळ्याच्या मार्गावरील पहिल्या दोन किलोमीटरच्या टप्प्यात २०० मीटर अंतरावर तर त्यापुढे तुंगार्लीपर्यंत प्रत्येक ३०० मीटर अंतरावर असे ५६ हाइट बॅरिअर्स बसविण्यात येणार आहेत. सध्या तीन किमीच्या टप्प्यात १५ हाइट बॅरिअर्स लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यामुळे, यापुढे मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर प्रवास करणाऱ्या ३.३ मीटरपेक्षा उंच तसेच अवजड वाहनांना फास्ट लेनमधून प्रवास करता येणार नसल्याने अपघातांचे आणि वाहतूककोंडीचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. २२ जून रोजी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या या हाइट बॅरिअर्सचे उद्घाटन महामार्ग पोलिस विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज