अ‍ॅपशहर

नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; गणेश नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांच्यासह ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची नवी मुंबई पालिकेतील सत्ता धोक्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Sep 2019, 8:13 pm
नवी मुंबई: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांच्यासह ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची नवी मुंबई पालिकेतील सत्ता धोक्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganesh-naik


नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका भरगच्च कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांच्या अंगावर भाजपचा शेला टाकून त्यांना पक्षप्रवेश दिला. त्यांच्यापाठोपाठ माजी खासदार संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार आणि नवी मुंबईतील ४८ नगरसेवकांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं असून नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता धोक्यात आली आहे.

गावठाणाचा प्रश्न सोडवा

दरम्यान, गणेश नाईक यांनी यावेळी नवी मुंबईतील लोकांनी गरजेपोटी बांधलेली घरं आणि गावठाणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मी १५ वर्ष कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होतो. २००४मध्ये नवी मुंबईत एसआरए योजना राबवण्याचा प्रस्ताव मी दिला होता. मात्र हा प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही. सत्तेत असूनही नवी मुंबईत एसआरए योजना राबवू शकलो नाही, याची मला खंत आहे, असं सांगतानाच माझ्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही, याचं शल्य कायम मनाला बोचत राहिल, असं नाईक यांनी सांगितलं. यावेळी नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचं प्रचंड कौतुक केलं. जागतिक मंदी असतानाही फडणवीस यांनी राज्य स्थिरस्थावर ठेवलं, अशा शब्दांत नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज