नवी मुंबई : एनएमएमटीच्या काही मार्गांवर प्रवाशांच्या मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे काही बसमार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये लाँगरूटमध्ये २९ आणि रिंग रुटमध्ये १० क्रमांकाच्या बसगाड्यांचा समावेश आहे.
लाँग रूटमध्ये आणि रिंग रूटमधील प्रवाशांच्या मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे तोट्यातील मार्ग बंद करून त्या मार्गावरील बसगाड्या अन्यत्र वळविण्यात आल्याचे परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले. याशिवाय, वातानुकूलित बसगाड्याही कमी प्रतिसादाअभावी बंद करण्यात आल्या आहेत. तर, काही मार्गांवरील बसगाड्यांना प्रतिसाद कमी मिळत असल्याने हा निर्णय घेतल्याचे परिवहन सभापती मोहन म्हात्रे यांनी सांगितले.