नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीजवाहिनीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम शुक्रवार, ६ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार असल्यामुळे वाशी विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाच्या वाशी कार्यालयाने कळविले आहे. वृषाली हॉटेल ते दशमेरा आणि दशमेरा ते अल्ट्राटेक सिमेंट, भूषण हॉटेल, एमआयडीसी रबाळे आदी परिसर, एचटी ग्राहक - भारत बिजली, हिंदुस्तान लिव्हर, दिवा नाका, शिवाजी फ्लोअर मिल आणि मेरीडियन फ्लोअर मिल, इंडिगो, पोलिस स्टेशनच्या मागील परिसर, महाजन रुग्णालय आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर, सानपाडा परिसर, एम. जी. नगर, अलाना ग्रुप आणि कुकशेत परिसर आदी भागांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
वाशीत आज वीज नाही
महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीजवाहिनीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम शुक्रवार, ६ जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार असल्यामुळे वाशी विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाच्या वाशी कार्यालयाने कळविले आहे.
Maharashtra Times 6 Jan 2017, 3:00 am