अ‍ॅपशहर

माऊंट अबूला जावे ही तर नगरसेवकांची इच्छा

महापालिकेचे कामकाज, सभाशास्त्र, कायदे, महापालिका अधिनियम या सर्वांची माहिती नगरसेवकांना व्हावी म्हणून माऊंटअबूला जाण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. सोमवारी झालेल्या महासभेत सर्व नगरसेवकांनी माऊंटअबूला जाण्यासाठी सहमती दर्शविली. प्रशिक्षण येथेच आयोजित करून आपण स्वच्छ शहराला भेट देऊ, असा आयुक्तांचा चांगला सल्ला फिरण्याच्या हौसेमुळे नगरसेवकांनी नाकारला. त्यामुळे प्रशिक्षणासोबत पिकनिकही होईल, या आनंदात पनवेलचे नगरसेवक आहेत.

Maharashtra Times 22 Oct 2017, 4:00 am
शहरातच प्रशिक्षण घेण्याचा आयुक्तांचा सल्ला नाकारला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम panvel corporators are going to mount abu for training
माऊंट अबूला जावे ही तर नगरसेवकांची इच्छा

कुणाल लोंढे, पनवेल

महापालिकेचे कामकाज, सभाशास्त्र, कायदे, महापालिका अधिनियम या सर्वांची माहिती नगरसेवकांना व्हावी म्हणून माऊंटअबूला जाण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. सोमवारी झालेल्या महासभेत सर्व नगरसेवकांनी माऊंटअबूला जाण्यासाठी सहमती दर्शविली. प्रशिक्षण येथेच आयोजित करून आपण स्वच्छ शहराला भेट देऊ, असा आयुक्तांचा चांगला सल्ला फिरण्याच्या हौसेमुळे नगरसेवकांनी नाकारला. त्यामुळे प्रशिक्षणासोबत पिकनिकही होईल, या आनंदात पनवेलचे नगरसेवक आहेत.

दीडशे वर्षांची नगरपालिका संपुष्टात येऊन पनवेल महापालिका स्थापन झाली. महापालिकेत अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून गेल्यामुळे कामकाजाची माहिती घेण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशासनाने यापूर्वीच हा प्रस्ताव महासभेत मांडला होता. इच्छुक नगरसेवकांनी नावे नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे महापालिकेतील ८४ नगरसेवकांपैकी ७३ नगरसेवकांनी नावे नोंदविल्याने ११ नगरसेवक वगळता सर्वांचीच माऊंटअबू येथे जाण्याची इच्छा आता लपून राहिलेली नाही. प्रशिक्षण शिबिराचा खर्च महापालिका करणार असल्यामुळे नगरसेवक तयार झाले आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत हा विषय पुन्हा चर्चेला आला. यावेळी नगरसेवक नितीन पाटील, जगदीश गायकवाड, परेश ठाकूर यांनी सहमती दर्शविली. भाजपचे शहरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील यांनी भाजपच्या सर्व महिला नगरसेवकांचा विमानखर्च पक्षातर्फे करण्यात येईल, असे जाहीर करून महापालिकेच्या खर्चांचा रेल्वेप्रवास नाकारला. लागलीच जगदीश गायकवाड यांनी विरोधी पक्षाचे गटनेते परेश ठाकूर विरोधी पक्षाच्या विमानप्रवासाचा खर्च करतील, असे सांगितले. आयुक्त सुधाकर शिंदे यांनी यावेळी चर्चेत भाग घेऊन तीन दिवस प्रशिक्षण घेण्यापेक्षा माऊंटअबूला जाण्यापेक्षा संपूर्ण प्रशिक्षण आपण पनवेलमध्येच आयोजित करू, असा महापालिकेच्या हिताचा सल्ला दिला. प्रशिक्षण इथे घेऊ आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवलेल्या शहरांना भेट देऊ, असेही ते म्हणाले. मात्र प्रशिक्षणाच्या निमित्ताने सहलीचा मूड असलेल्या नगरसेवकांनी तोंडे वाकडी केली. नवीन नगरसेवक अधिक आहेत, त्यामुळे प्रशिक्षण माऊंटअबूलाच जाऊन घेऊ, अशी इच्छा सर्वांनी प्रकट केली. सर्वांच्या इच्छेपुढे आयुक्तांचा महापालिकेच्या हिताचा सल्ला मागे पडला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज