चित्रनगरी येथे आज शूटिंग बंद
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आज, रविवारी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये काही तास शूटिंग बंद ठेवण्यात येणार आहे. चित्रनगरीमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. चित्रनगरी येथील अधिकाऱ्यांशी संपर्क झाला असता किती वेळासाठी शूटिंग बंद ठेवण्यात येणार याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.