अ‍ॅपशहर

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार!: फडणवीस

'सावित्री नदीच्या पुरात वाहून गेलेली वाहने व प्रवाशांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून अपघाताच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसंच, भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून राज्यातील सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल,' असंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra Times 3 Aug 2016, 5:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pwd will do structural audit of old bridges in maharashtra
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार!: फडणवीस

'सावित्री नदीच्या पुरात वाहून गेलेली वाहने व प्रवाशांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून अपघाताच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसंच, भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून राज्यातील सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल,' असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई-गोवा महामार्गावरील राजेवाडी फाट्याजवळ सावित्री नदीवर असलेला पूल काल रात्री वाहून गेला. पुलावरून जाणारी काही वाहनंही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. विविध आपत्कालीन यंत्रणांच्या मदतीनं वाहून गेलेल्या वाहनांचा व प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज महाडमधील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. तसंच, दुर्घटनास्थळी जाऊन मदतकार्याचीही माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची ग्वाही दिली. 'अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटना नेमकी कशामुळं घटली हे स्पष्ट होईलच, पण सध्या आमची प्राथमिकता शोधकार्याला आहे. पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान आहे. त्यामुळं ठोस काहीच सांगता येणार नाही. मात्र, सध्या प्रशासनाकडं असलेल्या माहितीपेक्षा अधिक जीवितहानी झाली आहे का याची माहिती घेतली जात आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. बेपत्ता प्रवाशांच्या नातलगांसाठी प्रशासनानं हेल्पलाइन सुरू केली आहे. राज्य सरकार दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी यावेळी दिली.

दुर्घटनाग्रस्त पुलाची मुदत संपल्याच्या सूचना एका ब्रिटिश संस्थेनं संबंधित यंत्रणेला आधीच दिल्या होत्या याकडं पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधताच, 'हा सगळा चौकशीचा भाग आहे. त्यातून सर्वकाही पुढं येईलच,' असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज