मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असून गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. शेट्टी यांचा पक्ष सध्या काँग्रेस आघाडीत आहे. या आघाडीत मनसेने सहभागी होण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. राज ठाकरे यांच्याबरोबरची शेट्टी यांची ही दुसरी भेट आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शेट्टी यांनी राज यांची भेट घेतली होती. बुधवारी पुण्यात पक्षाची बैठक घेऊन विधानसभेच्या ४९ जागा लढविण्याचे जाहीर केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आज ठाकरेंसोबत चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने आघाडीत सहभागी व्हावे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्न आहेत.
राज ठाकरे-राजू शेट्टी यांची मुंबईत भेट
विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असून गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2019, 4:00 am