वाघांची जोडी
औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानातून आणलेली करिष्मा आणि शक्ती ही वाघांची जोडी भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानात दाखल झाली आहे. करिश्मा सहा, तर शक्ती चार वर्षांचा असून वातावरणाशी जुळवून घेण्याकरिता त्यांना सध्या सुरक्षित पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पहाण्यासाठी मुंबईकरांना किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शैलेश जाधव