अ‍ॅपशहर

भातशेतीला तडाखा

ओखी वादळाचा फटका अलिबागनजीकच्या भोनंग येथील बावनखारीतील शेतकऱ्यांना बसला असून सुमारे ४०० एकरात आलेले भातपीक वादळाने आलेल्या उधाणाच्या लाटांच्या माऱ्यात नष्ट झाले आहे. उधाणाच्या लाटांच्या तडाख्याने आधाराला असणाऱ्या बावनखारीतील संरक्षित बंधाऱ्याला (बाहेरकाठा) खिंडार पडले. यामुळे समुद्राचे पाणी घुसून लाखो रुपयांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. खारभूमी विभागाने केलेल्या दुर्लक्षाचा हा परिणाम असल्याचा आरोप केला जात आहे.

Maharashtra Times 8 Dec 2017, 4:00 am
अलिबागच्या बावनखारीतील ४०० एकरावरील पीक नष्ट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ricecrop affected due to okhi storm
भातशेतीला तडाखा

म. टा. वृत्तसेवा, अलिबाग

ओखी वादळाचा फटका अलिबागनजीकच्या भोनंग येथील बावनखारीतील शेतकऱ्यांना बसला असून सुमारे ४०० एकरात आलेले भातपीक वादळाने आलेल्या उधाणाच्या लाटांच्या माऱ्यात नष्ट झाले आहे. उधाणाच्या लाटांच्या तडाख्याने आधाराला असणाऱ्या बावनखारीतील संरक्षित बंधाऱ्याला (बाहेरकाठा) खिंडार पडले. यामुळे समुद्राचे पाणी घुसून लाखो रुपयांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. खारभूमी विभागाने केलेल्या दुर्लक्षाचा हा परिणाम असल्याचा आरोप केला जात आहे.

अलिबामधील खाडीकिनारी वादळाचा फटका जाणवल्याने खाडीलगतच्या भातशेतीमध्ये समुद्राचे पाणी घुसून भातशेती नापीक झाल्याचे चित्र अलिबाग तालुक्यात दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पेण खारेपाटात सुमारे अडीच हजार एकरातील भातशेतीचे समुद्राचे पाणी घुसून नुकसान झाले होते. अलिबाग तालुक्यात भोनंग गावानजीकच्या खाडीपट्ट्यात सुमारे ६०० एकरात बावन खार पसरली आहे. या बावनखारीत ४०० एकरावर भातशेतीचे पीक परिसरातील शेतकरी घेतात. केवळ भातशेतीवरच येथील जनतेचा उदरनिर्वाह चालतो.

या बावनखारीला संरक्षण करण्यासाठी खारभूमी विभागाचा बाहेरकाठा आहे. हा बाहेरकाठा गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी भोनंग गावातील बाबूशेठ शेळके यांनी अनेकदा खारभूमी विभागाकडे जाऊन याबाबतची माहिती देऊन बाह्यकाट्याची दुरुस्ती करण्याची विनंती केली होती. खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी वेळ मारून नेली असल्याचे बाबूशेठ यांनी सांगितले.

बावनखारीला भविष्यात मोठी खंड जाऊ नये म्हणून येथील शेतकऱ्यांनी आपल्या परीने पडलेल्या खांडीची तात्पुरती डागडुजी केली होती. गेले तीन वर्ष आपल्यावर येणाऱ्या संकटाला थोपविण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांनी केला. वादळाच्या लाटांच्या भडिमारात हा बाहेरकाठ संपूर्ण फुटला आणि बावनखारीचे संरक्षण करणाऱ्या कट्ट्याला खिंडार पडले. पडलेल्या खिंडाराने बावनखारीतील पिकल्या शेतात समुद्राचे पाणी घुसले. या पाण्याचा वेग इतका होता की शेतीतून शेतकऱ्यांनी रचलेल्या भाताच्या मळण्या शेतात कलंडल्या. गेले दोन दिवस बावनखारीत पाणी साचून राहिले असल्याने सुमारे ४०० एकरातील पिकलेल्या भाताचे नुकसान झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज