अ‍ॅपशहर

हायब्रीड बसच्या मार्गात बदल

काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महागरपालिकेच्या परिवहन उपक्रमात दोन हायब्रीड बस दाखल झाल्या होत्या. या बसद्वारे वाशी रेल्वेस्थानक ते महापे मिलेनियम बिझनेस पार्क (मार्गे कोपरखैरणे-घणसोली) या नव्या बसमार्गावर सेवा दिली जात होती. पण प्रावाशांचा योग्य प्रातिसाद न मिळाल्याने हा बसमार्ग बंद करून एनएमएमटीच्या वातानुकुलीत बसमार्गावर या बस धावत आहेत.

Maharashtra Times 28 Jul 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम route change fo highbrid bus
हायब्रीड बसच्या मार्गात बदल

काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महागरपालिकेच्या परिवहन उपक्रमात दोन हायब्रीड बस दाखल झाल्या होत्या. या बसद्वारे वाशी रेल्वेस्थानक ते महापे मिलेनियम बिझनेस पार्क (मार्गे कोपरखैरणे-घणसोली) या नव्या बसमार्गावर सेवा दिली जात होती. पण प्रावाशांचा योग्य प्रातिसाद न मिळाल्याने हा बसमार्ग बंद करून एनएमएमटीच्या वातानुकुलीत बसमार्गावर या बस धावत आहेत.

बॅटरीवर चालणाऱ्या आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपयुक्त अशा या बस असल्याने या बसचा चांगलाच गाजावाजा झाला होता. सुरुवातीला या दहा बस घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र ही संख्या दोनवर आली. अखेर हायब्रीड बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या. एनएमएमटीचे जे काही वातानुकूलीत बसमार्ग आहेत, त्या सर्व बसमार्गांवर मोजक्या फेऱ्या हायब्रीड बसला देण्यात आल्या आहेत.

हायब्रीड बसचे मार्ग बंद करण्याबाबत परिवहन प्रशासनाने सांगितले की, याच मार्गावर केडीएमटीचीही वातानुकुलीत बस सुरू असून तिकीट कमी असल्याने या बसला अधिक प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे एमएमएमटी बसला अल्प प्रतिसादामुळे तोटा सहन करावा लागला. त्यामुळे तो मार्ग बंद करावा लागला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज