\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bसारी या आजाराचे तीन रुग्ण शनिवारी वाढले आहे. तिन्हीही रुग्ण खासगी रुग्णालयातील असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सारी रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २९७ झाली आहे. २८८ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून, पाच जणांचे स्वॅब करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सात जणांच्या स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे.