मुंबईः शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या कारनं एका हरणाला चिरडल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच वनधिकाऱ्यांनी वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून वाहनचालकाला अटक केली. या घटनेची स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आल्याचे वनधिकाऱ्यांनी सांगितले. नॅशनल पार्कमध्ये २८ नोव्हेंबरला सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावरून एक हरणांचा कळप जात होता. या कळपाने रस्ता ओलांडल्यानंतर एक हरीण मागे राहिले. हे हरीण रस्ता ओलांडत असताना टोयाटो फॉर्च्युनर कारने त्याला धडक दिली.
शिवसेना खासदाराच्या कारनं हरणाला चिरडलं
मुंबईः शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या कारनं एका हरणाला चिरडल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2019, 4:00 am