मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित गरवारे क्लबचे सदस्यत्व बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचा आरोप असलेले उदय नरेंद्र जिनंद्र व हिमांशू नरेंद्र जिनंद्र या दोघांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. त्यामुळे मरिन ड्राइव्ह पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
बोगस सदस्यांना धक्का
दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित गरवारे क्लबचे सदस्यत्व बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचा आरोप असलेले उदय नरेंद्र जिनंद्र व हिमांशू नरेंद्र जिनंद्र या ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2020, 4:00 am