नवी मुंबई : रस्ता ओलांडणाऱ्या अमितकुमार राम (२४) या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी रबाळे एमआयडीसीत घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. अमितकुमार हा आठवडाभरापूर्वीच कामानिमित्त मूळ गाव उत्तरप्रदेश येथून आला होता. तो रबाळे एमआयडीसीतील कंपनीत कामाला लागला होता. तो कधी कंपनीत अथवा भिम नगर येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी रहात होता. शनिवारी रात्री तो बहिणीच्या घरी गेला. त्यानंतर रविवारी सकाळी कामावर पायी जात होता. यावेळी रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात वाहनाची त्याला धडक दिली.
तरुणाचा मृत्यू
रस्ता ओलांडणाऱ्या अमितकुमार राम (२४) या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी रबाळे ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Nov 2019, 4:00 am