नवी मुंबई : मुंबईहून सायन-पनवेलमार्गे नेरूळ येथे जाणाऱ्या तरुणाची मोटारसायकल भर रस्त्यात घसरल्याने हा तरुण मागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी वाशी येथे घडली. वाशी पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे पामबीच मार्गावर असलेल्या जुई पुलावरील लोखंडी पट्टया उखडल्या गेल्याने या लोखंडी पट्ट्यांमुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव मुद्दत्सर नागरबावडी (२६) असे असून तो नेरुळ येथे रहाण्यास होता.
बाइक घसरून तरुणाचा मृत्यू
मुंबईहून सायन-पनवेलमार्गे नेरूळ येथे जाणाऱ्या तरुणाची मोटारसायकल भर रस्त्यात घसरल्याने हा तरुण मागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी वाशी येथे घडली.
Maharashtra Times 11 Mar 2018, 11:38 am