बीड : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथे भावा-भावाच्या भांडणातून सख्या भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. विलास मोहन यशवंत (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे. बंडू मोहन यशवंत व विलास मोहन यशवंत या दोन भावातील वाद एवढा विकोपाला गेला की, यात बंडूने रागाच्या भरात विलासचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.
दगडाने ठेचून भावाचा खून
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथे भावा-भावाच्या भांडणातून सख्या भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केला ही घटना रविवारी संध्याकाळी घडली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2019, 4:00 am