अ‍ॅपशहर

शिष्यवृत्ती परीक्षा आता २४ फेब्रुवारीला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा १७ ऐवजी २४ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.

Maharashtra Times 20 Dec 2018, 11:53 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम scholarship-exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा १७ ऐवजी २४ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.

दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यभर एकाच दिवशी घेण्यासंदर्भात नियोजन केले जाते. यंदाही ती १७ फेब्रुवारीला घेण्यात येणार होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा १७ फेब्रुवारीला घेण्यात येणार असल्याने शिष्यवृत्ती आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यात एकाच दिवशी शक्‍य नसल्याची बाब लक्षात घेऊन इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या बदलाबाबत शाळास्तरावर माहिती देण्याविषयी कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज