अ‍ॅपशहर

विद्यार्थिनीची आत्महत्या

मोबाइलफोनवर चॅटिंग करत असल्याच्या संशयावरून वडिलांकडून समज मिळाल्याने बारावीत शिकणाऱ्या घणसोलीतील अंकिता सोनवणे (१७) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. रबाळे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Maharashtra Times 15 Feb 2017, 3:00 am
नवी मुंबई : मोबाइलफोनवर चॅटिंग करत असल्याच्या संशयावरून वडिलांकडून समज मिळाल्याने बारावीत शिकणाऱ्या घणसोलीतील अंकिता सोनवणे (१७) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. रबाळे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम twelth standard student suicide
विद्यार्थिनीची आत्महत्या


घणसोलीतील घरोंदा वसाहतीमधील सिद्धेश्वर इमारतीत आई-वडील आणि लहान बहिणीसह राहणारी अंकिता नेरुळमधील कॉलेजात बारावीचे शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री ती घरातील स्वयंपाकघरामध्ये बसून अभ्यास करत होती. रविवारी पहाटेच्या सुमारास गाणी ऐकण्यासाठी तिने वडिलांचा मोबाइल घेतला होता. मात्र अंकिता कुणाशीतरी मोबाइलवरून चॅटिंग करत असल्याचा तिच्या वडिलांचा समज झाला. त्यांनी अंकिताला अभ्यास करण्याबाबत समज दिली. अंकिताने त्याच रागात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज