मुंबई : चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पणातच 'दिले देके देखो' या पहिल्या चित्रपटातील गाण्यांपासूनच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उषा खन्ना यांनी दिल देके देखोसह शबनम, सौतन, साजन बिना सुहागन अशा गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिले. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोजक्या महिला संगीतकारांमध्ये ७७ वर्षीय खन्ना यांची गणना होते. मधुबन खुशबू देता है, छोडो कल की बातें, पल भर के लिए कोई हमे, तेरी गलियों में ना रखेंगे कदम, चांद को क्या मालूम अशी त्यांची गाणी अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत. सन १९५९ पासून त्यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी सुमारे सहा दशके या क्षेत्रामध्ये काम केले. बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो एैसे ना थे, साजन की सहेली, अनोखा बंधन, आओ प्यार करे यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. सन १९६०-१९८० या तीन दशकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अनेक नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. सन २००३ मध्ये प्रदर्शित झालेला 'दिल परदेसी हो गया' हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट.
उषा खन्ना यांना 'लता मंगेशकर
चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पणातच 'दिले देके देखो' या पहिल्या चित्रपटातील गाण्यांपासूनच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संगीतकार उषा ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2019, 4:00 am