नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रात टायफॉइड कंज्युगेट लसीकरण अभियान सुरू झाले असून ही मोहीम २५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्र नेरुळ से. ४८, नेरुळ फेज १, शिरवणे, तुर्भे, इंदिरानगर, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा या ११ नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येत असून मागील सात दिवसांत नऊ महिने ते १५ वर्षांआतील एकूण ७२ हजार ५२९ मुलांना लसीकरण करण्यात आले आहे. या पुढील लसीकरण सत्रे १२, १७ आणि १८ ऑगस्ट रोजी होतील.
लसीकरण अभियान
नवी मुंबई पालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रात टायफॉइड कंज्युगेट लसीकरण अभियान सुरू झाले असून ही मोहीम २५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे...
Maharashtra Times 31 Jul 2018, 4:00 am