मुंबईः विदर्भात अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८ डिसेंबर २०१९ रोजी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे दिली. याठिकाणी ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. आठ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.
आठ डिसेंबरला मतदान
मुंबईः विदर्भात अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८ डिसेंबर २०१९ रोजी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2019, 4:00 am