अ‍ॅपशहर

गाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेलजवळ बुधवारी पहाटे घडलेल्या विचित्र अपघातात अश्विनी रहाटे (४३) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Times 13 Oct 2017, 4:00 am
नवी मुंबई ः मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेलजवळ बुधवारी पहाटे घडलेल्या विचित्र अपघातात अश्विनी रहाटे (४३) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम women died in accident
गाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू


अश्विनी या मंगळवारी रात्री कोल्हापूर येथून लग्झरी बसने मुंबईत येत होत्या, ती बस पहाटेच्या सुमारास एक्स्प्रेस वे मार्गावरील रस्ता दुभाजकावर चढल्याने त्या बसमधील अन्य प्रवाशांसह रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र याचवेळी पाठीमागून येणाऱ्या पिकअप जीपने त्यांना धडक दिली. यात त्या जागीच ठार झाल्या. वाहनचालक फरार झाला आहे. अश्विनी रहाटे या जोगेश्वरी येथे रहात होत्या. त्या नातेवाइकांसह कोल्हापूर येथे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर रात्री पुन्हा त्या मुंबईला परतत होत्या. पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा अपघात झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज