तुर्भे सेक्टर २२मधील जमुना निवासमध्ये रहाणाऱ्या सुमन हांडे (७०) या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या विजय बनसोडे (२७) या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी जळगाव येथून अटक केली. हत्या केल्यानंतर विजय सुरतला पळून गेला होता. मात्र जळगाव येथे मूळ गावी गेल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून हांडे यांच्या घरातील दागिने व अन्य ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुमन यांनी विजयकडे गॅझेट बनविण्यासाठी पैसे दिले होते. मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतरही त्याने गॅझेट बनवून दिले नव्हते. त्यामुळे सुमन यांनी त्याला फोनवरून प्रचंड शिवीगाळ केली होती. त्यामुळे संतापलेल्या विजयने त्याचवेळी सुमन हांडे यांच्या घरामध्ये घुसून त्यांची हत्या केली.
वृद्धेची हत्या करणारा अटकेत
तुर्भे सेक्टर २२मधील जमुना निवासमध्ये रहाणाऱ्या सुमन हांडे (७०) या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या विजय बनसोडे (२७) या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी जळगाव ...
Maharashtra Times 27 May 2018, 4:00 am