अ‍ॅपशहर

वसईत कॉस-मॉस कंपनीला भीषण आग; ३ कामगारांचा अडकल्याने जागीच मृत्यू

Vasai Fire: वसईत कॉस-मॉस कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली आहे.या कंपनीत आतमध्ये ३ कामगार अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

Authored byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2022, 4:30 pm
पालघर : वसईत कॉस-मॉस कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीच्या धुराचे कल्लोळ आजूबाजूच्या ४ ते ५ किलोमीटर परिसरातून दिसत आहेत. कंपनीत स्फोट होऊन आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपनीत आतमध्ये ३ कामगार अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vasai Local News
वसईत कंपनीला भीषण आग; ३ ते ४ कामगार अडकल्याची भीती


मुंबई अहमदाबाद महामार्ग जवळ वसई जूचंद्र वाकीपाडा परिसरातील कॉस-मॉस कंपनीला आज दुपारी अडीच वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
लेखकाबद्दल
प्रशांत पाटील
प्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज