अ‍ॅपशहर

पब्जीच्या नादात इमारतीवरून पडून मुलगा जखमी

पब्जी खेळ यापूर्वी अनेकांच्या जीवावर बेतला आहे. या खेळामुळे अनेक मुलांच्या मनावर परिणाम झाला. आता पब्जीच्या नादात एक मुलगा इमारतीवरून खाली पडल्याची घटना घडली आहे. पालघरमधील ही घटना आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 17 May 2022, 7:16 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर ः पब्जी खेळण्याच्या नादात १६ वर्षांचा मुलगा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना शिरगाव येथे घडली. शादान शेख असे त्याचे नाव असून त्याला उपचारासाठी पालघर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pubg game boy fell from the building
पब्जीच्या नादात इमारतीवरून पडून मुलगा जखमी


पालघरमध्ये पब्जी खेळत असताना शादान हा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. विशेष म्हणजे, या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीवरून हा मुलगा पडल्याचे कळताच त्याला तातडीने पालघर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालघरपासून सात किलोमीटर अंतरावरील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या शिरगावात ही धक्कादायक घटना घडली.

बंदीला हरताळ?

पब्जीच्या विळख्यात तरुण अडकत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर बंदी लागू करण्यात आली. मात्र, तरीही हा खेळ उपलब्ध होत असून तरुण भान विसरून त्याच्या आहारी जात आहेत. त्यामुळेच बंदीच्या निर्णयाची तांत्रिकदृष्ट्या कडक अमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज