अ‍ॅपशहर

गरबा खेळण्यावरुन दोन गटात वाद, सोडवायला गेलेल्या तरुणाला इतकं मारलं की जीवच गेला...

विरार पूर्व सहकारनगर परिसरात बिठूरमाळी कंपाऊंड येथे राहणारा बैजनाथ शर्मा (२९) बुधवारी रात्री आपले केस कर्तनाचे दुकान बंद करून घरी परतला होता. रात्री एक वाजताच्या सुमारास दोन गटात गरबा खेळण्यावरून भांडण झाल्याचे त्याला समजले असता तो भांडण सोडविण्यासाठी गेला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 5:02 pm
विरार: विरार येथे गरबा खेळण्यावरुन दोन गटात झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बैजनाथ शर्मा (२९) असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virar news
गरबा खेळण्यावरुन दोन गटात वाद, सोडवायला गेलेल्या तरुणाला इतकं मारलं की...


नेमकं प्रकरण काय?

विरार पूर्व सहकारनगर परिसरात बिठूरमाळी कंपाऊंड येथे राहणारा बैजनाथ शर्मा (२९) बुधवारी रात्री आपले केस कर्तनाचे दुकान बंद करून घरी परतला होता. रात्री एक वाजताच्या सुमारास दोन गटात गरबा खेळण्यावरून भांडण झाल्याचे त्याला समजले असता तो भांडण सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी सात ते आठ जणांनी त्याला लोखंडी सळईने मारहाण केली, यात शर्मा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता गुरूवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा-Thailand Firing: नोकरी गेल्यानं बनला सैतान, पत्नी, मुलालाही सोडलं नाही, वाचा थायलंड गोळीबाराची इनसाईड स्टोरी

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा हे भांडण सुरु होते त्यावेळी त्यांनी पोलिसांशी संपर्क केला, मात्र पोलीस उशिरा आले त्यामुळे या हत्येला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलिसांमार्फत याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा-दोन महिन्यांवर लग्न आलेलं, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

महत्वाचे लेख