अ‍ॅपशहर

Parbhani : तू केस मागे का घेत नाहीस? दोन गटांत काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण; तीन जखमी

Parbhani News : परभणीतील सेलूमध्ये एका जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2022, 8:24 am
परभणी : भांडणाची केस मागे का घेत नाहीत? या कारणावरून दोन गटात काठ्या, कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील वालूर येथे घडली आहे. या घटनेमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळतात सेलू पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी दोन्ही गटाकडून सेलू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parbhani news
तू केस मागे का घेत नाहीस? दोन गटांत काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण; तीन जखमी


सेलू तालुक्यातील वालूर येथील निवृत्ती सारुक हे गावात होते. यावेळी एकनाथ सारुक, अशोक सारुक, माणिक सारुक, सरस्वती सारुक, सुनिता सारुक, भाग्यलक्ष्मी सारुक यांनी संगणमत करुन तुम्ही यापूर्वी झालेल्या भांडणाची केस मागे का घेत नाहीत, असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना काठ्या, कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला. निवृत्त सारुक आणि त्यांची पत्नी या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचार सुरू असताना दिलेल्या तक्रारीवरून सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगा-सूनेच्या संसारात वाद, तडजोडीसाठी नातेवाईकांना बोलावलं, बैठक सुरु असताना

गुन्हा दाखल होताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, पोलीस उपनिरीक्षक पुरी, पोह. हिंगे यांनी भेट दिली आहे. अधिक तपास पोलीसउपनिरीक्षक पुरी या करीत आहेत. दरम्यान याच प्रकरणात एका गटाकडूनही फिर्याद देण्यात आली आहे. आरोपी निवृत्ती माणिक सारुक, ज्ञानेश्वर बापूराव सारुक, बापूराव सोनाजी सारूक, जिजाबाई बापूराव सारूक, राधा निवृत्ती सारूक, सत्यभामा ज्ञानदेव सारूक, सुमित्रा नारायण ढाकणे आदीनी संगनमत करुन जुन्या भांडणाची केस मागे का घेत नाही, म्हणून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावरुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Parbhani : गडकरींच्या पारदर्शकतेचा फज्जा! १८९ कोटींच्या महामार्गाला तडे,

महत्वाचे लेख