अ‍ॅपशहर

संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर फेकली फुले; फुलांना भाव मिळेना, फुकट पण कोणी घेईना

Parbhani News : दसरा हा आनंदाचा सण. पण शेतकऱ्यांसाठी हा सण आनंदाचा ठरत नाहीए. झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत नसल्याने आणि फुकटही घेऊन जात नसल्याने त्याने फुले रस्त्यावरच फेकून दिली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 9:43 am
परभणी : दसऱ्यासारख्या सणासुदीच्या काळामध्ये झेंडूच्या फुलाला भाव मिळत नसल्याने आणि विक्रीसाठी आणलेली फुले कोणी फुकटही घेऊन जात नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावरच फुले फेकून परभणी शहरातील गांधी पार्क येथे संताप व्यक्त केला आहे. अशाच परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे देखील सदरील शेतकऱ्याने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parbhani news
संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर फेकली फुले; फुलांना भाव मिळेना, फुकट पण कोणी घेईना


दसरा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असल्याने या सणाला मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलाची मागणी असते. मात्र असे असले तरी परभणीमध्ये झेंडूच्या फुलाला ३० रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे फुलाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली फुले शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विक्रीसाठी आणली होती.

दादासमोर लहान भावाने सोडले प्राण; भीषण अपघातात हसत्या-खेळत्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

फुलाला केवळ तीस रुपये भाव मिळतोय. तरीही कोणी फुल खरेदी करण्यासाठी येत नसल्याने सदरील शेतकऱ्याने नागरिकांना फुले फुकट घेऊन जा असे म्हणाला. यानंतरही नागरिक फुलं घेऊन जात नसल्याने शेतकऱ्याने फुले उधार घेऊन जा आणि पुढच्या वर्षी पैसे द्या, असं नागरिकांना सांगितलं. मात्र त्यानंतरही कुणी फुले घेऊन जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त केला. शेतकरी रस्त्यावर फुले फेकत असताना पाहून नागरिक मात्र चक्रावून गेले होते. शेतीपिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी संतप्त भावनाही शेतकऱ्याने व्यक्त केली.

इंजेक्शन मिळाले नाही म्हणून जीव गेला; रात्री झोपल्यावर पाहा युवकासोबत काय झालं

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज