अ‍ॅपशहर

मोठी बातमी: परभणीत शेतातील सेप्टिक टॅंकची सफाई करताना पाच मजुरांचा गुदमरुन मृत्यू

Parbhani News: परभणीत सेप्टिक टँकची सफाई करताना पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरातील शेतात ही घटना घडली आहे.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2023, 8:44 am
परभणी: परभणीत एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. सेप्टिक टॅंकची साफसफाई करत असताना गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरामध्ये एका शेतामध्ये गुरुवार ११ मे रोजी मध्यरात्री घडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Parbhani Labours Died


घटनेची माहिती मिळतात पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तर एका जणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज असे गुदमरून मृत्यू झालेल्या मजुरांची नावं आहेत.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण

परभणीच्या सोनपेठ तालुक्यामध्ये असलेल्या भाऊचा तांडा येथील एका शेतामध्ये आहे शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज, जमीर शेख शौचालयाच्या सेप्टिक टॅंकची साफसफाई करण्यासाठी गेले होते. ते दुपारचे तीन वाजल्यापासून त्यांची साफसफाई करत असताना मध्य रात्री उशिरा अचानक त्यांना गुदमरल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात आरोग्य विभागाने रुग्णवाहिका भाऊचा तांडा येथे पाठवली.


यावेळी शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद या पाच जणांना तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री त्यांना उशिरा तपासून मृत घोषित केले. तर, जमीर शेख यांना उपचारासाठी परळी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर परळी येथे उपचार करण्यात येत आहेत.

बंगला, महागड्या गाड्या अन् बरंच काही; ३० हजार पगार घेणाऱ्या इंजिनीअरकडे ७ कोटींची प्रॉपर्टी
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. सोनपेठ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार यांनी देखील घटनेचे गांभीर ओळखून रात्री घटनास्थळी उपचार करण्यासाठी तातडीने पथक पाठवले होते. रात्री तीन वाजेपर्यंत ते स्वतः परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते. सेप्टिक टॅंकची साफसफाई करत असताना गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे लेख