अ‍ॅपशहर

बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, व्यापारी जागेवरच कोसळला...

Parbhani News: बॅडमिंटन खेळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने सचिन तापडिया यांचा मृत्यू झाल्याची घटना परभणी शहरात घडली आहे. तापडिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

Authored byजयकृष्ण नायर | Edited byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2022, 3:53 pm
परभणी : बॅडमिंटन खेळत असताना एका व्यापाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने व्यापारी जागेवरच खाली कोसळले, त्यानतंर त्यांना उपचारासाठी परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदरील घटना आज गुरुवार (२५ ऑगस्ट) रोजी घडली. सचिन तापडिया असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. सचिन तापडिया यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sachin Tapadia


परभणी शहरातील व्यापारी सचिन तापडिया हे बॅडमिंटन खेळत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तीने त्यांना उपचारासाठी परभणी शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सचिन तापडिया यांना मृत घोषित केले.

वाचा-महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बहुराष्ट्रीय कंपनीला हिसका; २३ जणांच्या मृत्यूला जबाबदार धरून स्वित्झर्लंडच्या कोर्टात खेचले

सचिन तापडिया यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. अचानक मृत्यू झाल्यामुळे दोन लेकर पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे परभणी शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन तापडे यांचे तापडिया ड्रायव्हिंग स्कूल ही नामांकित ड्रायव्हिंग स्कूल परभणीमध्ये आहे. यासोबत फायनान्स आणि इतर उद्योग असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार येणार आहेत.

वाचा- Video: मेळघाटातील रस्त्यांबाबत बोलताना गडकरी अधिकाऱ्यांना म्हणाले होते, 'मंत्रीपद गेले तरी काही फरक पडत नाही'
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज