अ‍ॅपशहर

कौतुकास्पद! तांड्यावरील सुनेची सीआरपीएफमध्ये निवड; गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत

गोकर्णा परमेश्वर चव्हाण यांचा काही वर्षांपूर्वी साईनगर तांडा येथील सचिन प्रकाश राठोड यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सासरी आलेल्या गोकर्णा यांनी आपल्या शिक्षणाचा हट्ट सासू-सासऱ्यांकडे धरला. सासू-सासर्‍यांनी क्षणाचा ही विचार न करता गोकर्णा यांना शिक्षणाची परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी आढोळ येथील उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला. सासू-सासर्‍यांची गरीब परिस्थिती आणि त्यांनी ठेवलेला विश्वास हे सार्थ करण्यासाठी पुढे त्यांनी बारावीची परीक्षा दिली व त्यामध्ये चांगल्या गुणांनी यशही मिळवले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2022, 5:59 pm
परभणी : जिंतूर तालुक्यातील साईनगर तांड्यावरील सून गोकर्णा सचिन राठोड (Gokarna Rothod) यांची देशसेवेसाठी सीआरपीएफमध्ये (CRPF) निवड झाली आहे. ११ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून आज मंगळवारी त्या साईनगर तांड्यात दाखल झाल्या. यावेळी गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांची फटाक्याची आतषबाजी व डीजेच्या तालावर नाचत, वाजत-गाजत त्यांची गावातून तांड्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. (selection of daughter in law gokarna thakur in crpf)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम selection of daughter in law gokarna thakur in crpf
तांड्यावरील सुनेची सीआरपीएफमध्ये निवड; गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत


गोकर्णा परमेश्वर चव्हाण (रा. वडचुना, ता. औंढा, जि. हिंगोली) यांचा काही वर्षांपूर्वी साईनगर तांडा येथील सचिन प्रकाश राठोड यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सासरी आलेल्या गोकर्णा यांनी आपल्या शिक्षणाचा हट्ट सासू-सासऱ्यांकडे धरला. सासू-सासर्‍यांनी क्षणाचा ही विचार न करता गोकर्णा यांना शिक्षणाची परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी आढोळ येथील उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला.

क्लिक करा आणि वाचा- 'चंद्रकांत खैरेंना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्यापासून कोणी रोखले आहे, माहीत नाही'

सासू-सासर्‍यांची गरीब परिस्थिती आणि त्यांनी ठेवलेला विश्वास हे सार्थ करण्यासाठी पुढे त्यांनी बारावीची परीक्षा दिली व त्यामध्ये चांगल्या गुणांनी यशही मिळवले. गोकर्णा यांच्या मनामध्ये देशसेवा करण्याची जिद्द असल्याने शेतामध्ये काम करत त्यानी आपल्या अभ्यास सुरूच ठेवला.

क्लिक करा आणि वाचा- दहा बालकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा; परिसरात दहशतीचे वातावरण

विशेष बाब म्हणजे गोकर्णा राठोड यांना एक ३ वर्षांचे मूल देखील आहे. गोकर्णा या आपल्या घरी आल्यावर त्यांनी सर्वप्रथम सासू-सासर्‍यांना सॅल्यूट करून सासर्‍यांच्या डोक्यावर आपल्या डोक्यातील मानची वर्दी घातली. हा क्षण खूपच भावुक असल्याने उपस्थित नातेवाईक व गांवकरी यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले.

क्लिक करा आणि वाचा- बँकेचे कर्ज फेडण्याची विवंचना, शेतकऱ्याने स्वतःच्या आयुष्याची दोर कापली

यावेळी गोकर्णा यांच्या स्वागतासाठी गोर सेनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच विजय आढे, प्रकाश राठोड, अमोल जाधव , हरिदास राठोड, विनोद राठोड, विकास राठोड, कोंडीराम जाधव, बबन चव्हाण, राजू राठोड, गणेश चव्हाण, सचिन राठोड, अविनाश आढे, पंढरीनाथ जाधव, भालचंद्र राठोड सह गावातील नागरिकांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज