अ‍ॅपशहर

'चिखल गाळ काढतो आहे... पैसे नको सर...', शिवसेना कार्यकर्त्याच्या बॅनरची जोरदार चर्चा

Parbhani News : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत ठिकठिकाणी फूट पडताना दिसत आहे. पण परभणीतील आमदार आणि खासदार मात्र ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत. आता एका कार्यकर्त्याने बॅनर लावले आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2022, 5:46 pm
परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. असे असले तरी सामान्य शिवसेना कार्यकर्ते अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षातील आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अस्वस्थ असताना परभणीच्या गंगाखेड शहरात शिवसेना उपजिल्हाप्रख विष्णू मुरकुटे यांनी चिखल गाळ काढत आहे... पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही काणा पाठीवर हात ठेवून तुम्ही नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा.. या आशयाचे बॅनर गंगाखेड शहरामध्ये लावल्याने या बॅनरून चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena news parbhani sena worker vishnu murkute baner
'चिखल गाळ काढतो आहे... पैसे नको सर...', शिवसेना कार्यकर्त्यांच्या बॅनरची जोरदार चर्चा


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर अनेक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेला दिवसेंदिवस हादरे बसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थ पसरली आहे.

दुसरीकडे भाजपासोबत जाण्यासाठी खासदारांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचे काही खासदार अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे. यातील अनेक खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता परभणीच्या गंगाखेड शहरांमधील शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी चिखल गाळ काढत आहे... पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही काणा पाठीवर हात ठेवून तुम्ही नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा.. या आशयाचे बॅनर गंगाखेड शहरात लावल्याने संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा होत आहे.

मातोश्रीशी एकनिष्ठ असलेला आमदार म्हणाला, 'उद्धव ठाकरेंच्या पत्राने शंभर हत्तींचं बळ मिळालं'

बालेकिल्लातील सर्वजण एकनिष्ठ

परभणी हा शिवसेनेचा तीस वर्षांपासून बालेकिल्ला आहे. ज्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, असा एकही नेता पुन्हा निवडून आलेला नाही. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी परभणीचे खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. तर शिंदे यांच्या समर्थनात लावण्यात आलेले बॅनर देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी फाडले होते.

'...आणि महाराष्ट्र रडला'; त्यांना राहावले नाही, शेवटी उद्धव ठाकरेंना पाठवले पत्र

महत्वाचे लेख