अ‍ॅपशहर

शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे; ग्रामस्थांनी बुकलले, कपडे फाटेस्तोवर मारले

विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथे घडली आहे. शिक्षकाने तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्यामुळे गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला चोप दिला आहे.

Edited byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2022, 5:53 pm
परभणी: विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथे घडली आहे. शिक्षकाने तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्यामुळे गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला चोप दिला आहे. ही घटना घडल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी शाळेला भेट देऊन शिक्षिका आणि विद्यार्थिनीच्या नातेवाईकांशी संवाद साधला आहे. या शिक्षकावर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी भुसारे यांनी सांगितले आहे. शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकाराला त्यांनी दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम villager beat teacher


गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असणारे बी. यु. रुद्रवार या नावाच्या शिक्षकांनी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या तीन मुलींसोबत अश्लिल चाळे केले. त्यामुळे नेहमीच्या प्रकारला वैतागलेल्या मुलींनी शिक्षक करत असलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे सोमवार १९ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर तांडा येथील नागरिकांनी शाळेवर जाऊन शिक्षकाला चांगला चोप दिला.
वसई बीचवर सापडलेली सूटकेस; थरकाप उडवणारी मर्डर मिस्ट्री, १३ महिन्यांनी गूढ उकललं
या प्रकाराची माहिती गंगाखेडचे गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट यांना देण्यात आली त्यानंतर सगट यांनी केंद्रप्रमुखांना शाळेला भेट देऊन नेमका काय प्रकार घडला आहे. याची माहिती घेण्यासाठी सांगितले तर आज मंगळवार २० सप्टेंबर रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी शाळेला भेट देऊन अंगणवाडी सेविका शाळेतील शिक्षिका आणि मुलींच्या नातेवाईकांशी संवाद साधून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे. त्यांचे लेखी म्हणणे लिहून घेतले आहे. या प्रकाराबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांना विचारणा केली असता त्यांनी शिक्षकांनी मुलींसोबत गैरवर्तन केले असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे शिक्षका पेशाला काळीमा फासला आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख