अ‍ॅपशहर

रजेवर सोडले; गायबच झाले!

पॅरोल, फर्लोवर सोडलेले ११८ कैदी येरवडा कारागृहातून फरारी

महाराष्ट्र टाइम्स 18 Dec 2018, 12:59 pm
Shrikrishna.Kolhe@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prisoners

@ShrikrishnaMT

पुणे :

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पॅरोल आणि फर्लोवर सोडलेले कैदी मोठ्या प्रमाणात फरारी असल्यामुळे त्यांची माहिती देण्यास कारागृह विभागाने वेगवेगळी कारणे देण्यास सुरुवात केली आहे. येरवडा कारागृहातून पॅरोल आणि फर्लोच्या रजेवर सोडल्यानंतर तब्बल ११८ कैदी फरारी झाल्याचे समोर आले आहे. या फरारी झालेल्या कैद्यांपैकी १०५ कैदी हे जन्मठेपेची शिक्षा झालेले आहेत. त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या प्रतिनिधीने माहिती अधिकारामध्ये अर्ज करून पॅरोल दिलेल्या कैद्यांची माहिती विचारली होती; तसेच पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर किती कैदी फरारी झाले, याची माहिती देण्याची मागणी केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांच्या अखत्यारितील सर्व माहिती दिली; तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या इतर कारागृह विभागानेदेखील माहिती दिली; पण येरवडा कारागृहाने पॅरोलच्या रजेवर सोडल्यानंतर फरारी झालेल्या कैद्यांची माहिती दिली नाही. ‘प्रश्नार्थक माहिती देता येत नाही; तसेच कैद्यांची वैयक्तिक बाब असल्यामुळे त्याचीदेखील माहिती देता येत नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले आहे. फॅर्लो सुविधा दिलेल्या कैद्यांची माहिती या पूर्वीही माहिती अधिकारामध्ये विचारण्यात आली होती. मात्र, त्या वेळीदेखील कैद्यांची वैयक्तिक माहिती देता येत नसल्याचे उत्तर देण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज