अ‍ॅपशहर

ई-रिक्षांचे मार्ग निश्चित

वाहतूक पोलिसांनी ई-रिक्षांसाठी शहरातील १४ मार्ग निश्चित केले असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ई-रिक्षांसाठीचे स्वतंत्र लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra Times 11 Aug 2017, 3:00 am
आरटीओकडून लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 e rickshaw routes finalised in pune city by traffic police
ई-रिक्षांचे मार्ग निश्चित


म. टा. प्रतिनिधी, पुणे
ई-रिक्षा शहरात लवकरच धावणार, अशा गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. वाहतूक पोलिसांनी ई-रिक्षांसाठी शहरातील १४ मार्ग निश्चित केले असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ई-रिक्षांसाठीचे स्वतंत्र लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला लर्निंग लायसन्स काढून एका महिन्यांच्या अंतराने पक्के लायसन्स मिळणार आहे. त्यामुळे एका महिन्यानंतर ई-रिक्षा शहरात धावताना दिसतील.

राज्य सरकारने सप्टेंबर २०१६मध्ये ई-रिक्षांना परवानगी दिली. तेव्हा परिवहन विभागाने ई-रिक्षांसाठीची नियमावली तयार केली आहे. देशभरातील ३०० उत्पादक कंपन्यांनी ई-रिक्षा पुरवठ्यासाठी परिवहन विभागाशी संपर्क साधला आहे. तसेच, नागरिक व व्यवसायासाठी इच्छुक असलेल्यांसाठी येत्या २० ऑगस्टला आरटीओच्या आवारात कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तसेच, प्रत्यक्ष ई-रिक्षा पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

सरकारचे खुले धोरण

ई-रिक्षासाठी केंद्र सरकारने खुले धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाने देखील यावर कोणतेही नियंत्रण न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ई-रिक्षांना परवान्याची गरज नाही. मात्र, ई-रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र ई-रिक्षाचे लायसन्स घ्यावे लागणार आहे. ‘ट्रान्सपोर्ट’ वाहनांसाठी किमान आठवी पास व्यक्तींना लायसन्स काढता येते. मात्र, ई-रिक्षांसाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. त्यासाठी ई-रिक्षा उत्पादक कंपन्यांकडून दहा दिवसांचे ट्रेनिंग घेऊन त्याचे सर्टिफिकेट आरटीअ‍ेमध्ये जमा करावे लागणार आहे. तसेच, ई-रिक्षा करमुक्त असणार आहेत. तसेच, प्रवासी भाड्यावरही कोणाचेही नियंत्रण राहणार नाही, असे बाबासाहेब आजरी यांनी या वेळी सांगितले.

पाच किमीसाठी एक रुपया खर्च

ई-रिक्षांचा सरासरी वेग ताशी २५ किलोमीटर प्रतितास आसणार आहे. या गाडीला चार बॅटरी असून, त्या सात ते आठ तास चार्जिंग केल्यानंतर ८० ते १०० किमी अंतर धावणार आहेत. यासाठी अवघे तीन युनिट वीज खर्ची पडणार आहे. त्यामुळे ही गाडी एक रुपयात पाच किमी अंतर चालणार आहे. मात्र, या रिक्षाची बॅटरी दरवर्षी बदलावी लागणार आहे. रिक्षाची किंमत दीड लाख रुपयांच्या आसपास आहे.
...
ई-रिक्षांसाठीचे मार्ग

- पद्मावती चौक ते बालाजीनगर चौक
- पुष्पमंगल चौक ते चंद्रलोक चौक
- खडी मशिन चौक ते उंड्री चौक
- विश्रांतवाडी चौक ते ५०९ चौक
- गणपतीमाथा ते कोंढवे धावडे
- काळेवाडी फाटा ते पिंपरी
- नाशिक फाटा ते कस्पटे चौक
- संभाजी चौक ते भक्तिशक्ती चौक
- धायरी फाटा चौक ते राजाराम पूल चौक
- पाषाण-सूस रोड, साई चौक ते सूस खिंड
- सांगवी फाटा ते कस्पटे चौक
- कमांड हॉस्पिटल रस्ता
- बी. टी. कवडे रस्ता
- वानवडी बाजार रस्ता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज