अ‍ॅपशहर

अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदतीचा हात; नुकसान भरपाई मिळणार दोन दिवसांत

हिवाळ्यातील थंडीसह अवकाळी पाऊस व वातावरणामुळे शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाकडून केलेल्या पंचनाम्यामुळे राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 14 Sep 2022, 11:49 am
पुणे : जिल्ह्यातील ४२ महसूल मंडलांमध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमधील नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने १६ कोटी ४७ लाख ७६ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. या संदर्भात गेल्या वर्षीच जिल्हा प्रशासनाने सरकारकडे मागणी केली होती. हा निधी मिळाल्याने पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात देता येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्याचे वाटप होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heavy rain victim.
अतिवृष्टीग्रस्तांना १६ कोटींची मदत


जिल्ह्यात १०० महसुली मंडले आहेत. गेल्या वर्षी दोन डिसेंबरमध्ये चौदापैकी दहा तालुक्यांतील ४२ महसूली मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासाने १६ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार १६ कोटी ४७ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. हा निधी संबंधित तालुक्यांना वर्ग करण्यात आला आहे. अतिवृष्टीदरम्यान पाऊस आणि थंडीमुळे हायपोथर्मिया आणि उपासमारीमुळे जनावरे दगावली. त्यात पशुधनामध्ये मोठ्या प्रमाणात दुभत्या जनावरांचा समावेश होता. तसेच, मृत मेंढ्यांच्या मालकांना आर्थिक मदत केली जाणार आहे. हिवाळ्यातील थंडीसह अवकाळी पाऊस व वातावरणामुळे शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाकडून केलेल्या पंचनाम्यामुळे राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती.

फळपिकांचे मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे दहा तालुक्यांतील शेती, फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याच्या भरपाईपोटी १५ कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अवकाळी पावसासह थंडीमुळे जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यासाठी जनावरांच्या मालकांना ८४ लाख २० हजार, बारामती तालुक्यात घरांची झालेल्या पडझड झाली, अशा नागरिकांना १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १३ मे २००५च्या सरकारच्या निर्णयानुसार, आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने १६ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर कऱण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त झाला असून, येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष मदत वाटपाला सुरुवात केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज