अ‍ॅपशहर

पुण्यात स्लॅब कोसळून ४ कामगार गंभीर जखमी

पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सुरू असलेल्या बांधकामाचे स्लॅब कोसळून ४ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. यातील दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Maharashtra Times 17 Oct 2017, 12:25 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 laborers seriously injured in slab collapse in pune
पुण्यात स्लॅब कोसळून ४ कामगार गंभीर जखमी

पु. ल. देशपांडे उद्यानासमोर सुरू असलेल्या बांधकामाचे स्लॅब कोसळून ४ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. यातील दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

सिंहगड रस्त्यावर पाटे डेव्हलपर्स यांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहे. आज सकाळी १० च्या सुमारास १० व्या मजल्यावरील स्लॅबची सेट्रिंग कोसळली. यात चार कामगार जखमी झाले. यातील दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पोलीस या प्रकरणाची अधिक तपास करी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, आमदार माधुरी मिसाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या दुर्घटनेची पाहणी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज