अ‍ॅपशहर

महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून खून

बुधवार पेठेतील रामेश्वर मार्केट जवळ एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Times 24 May 2017, 1:07 am
पुणे : बुधवार पेठेतील रामेश्वर मार्केट जवळ एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a knife attack on womans neck
महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून खून


बित्ती मुल्ला (वय २२, रा. जनता बिल्डींग, बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. बुधवार पेठेतील रामेश्वर मार्केट येथे महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने भररस्त्यात तरुणाने वार केले. हा तरुण महिलेकडे अधून-मधून येत होता. त्याच्यासोबत इतर काही तरुण होते. हल्ला केल्यानंतर तरुण पसार झाला. भररस्त्यात खूनाची घटना घडल्यामुळे एकच गोंधळा उडाला. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. जी. अंबुरे यांनी धाव घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज