अ‍ॅपशहर

आई रागावल्याने मुलीची गळफास घेत आत्महत्या

आई रागावते या कारणावरून एका १४ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील हडपसर येथील माळवाडी परिसरात आज दुपारी (रविवार) ही धक्कादायक घटना घडली. निकिता युवराज शिर्के असे या मुलीचे नाव आहे.

Maharashtra Times 5 Nov 2017, 9:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त। पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a school girl commits suicide in pune as mother scold her
आई रागावल्याने मुलीची गळफास घेत आत्महत्या


आई रागावते या कारणावरून एका १४ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील हडपसर येथील माळवाडी परिसरात आज दुपारी (रविवार) ही धक्कादायक घटना घडली. निकिता युवराज शिर्के असे या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता ही इयत्ता आठवीत शिकत होती. आज दुपारी तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी याबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

निकिताच्या शाळेला पंधरा दिवसांपासून सुट्टी आहे. सुट्टीच्या कालावधीत ती सतत घरातून बाहेर जात असल्याच्या कारणाने आई-वडिल तिच्यावर रागावले. आई-वडिलांचे रागावणे सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज